आपल्यासमोर कोणता उमेदवार उभा राहिल या कसल्याही बाबीचा विचार न करता बार्शी तालुक्यातील मालवंडी जिल्हा परिषद गटामधून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याची भीष्मप्रतिज्ञा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समर्थक सौ रेखा सूर्यकांत चिकणे यांनी केली. रेखा चिकणे यावेळी बोलताना म्हणाल्या की, गत जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे.गत निवडणूकीत राष्ट्रवादीचा उमेदवार आमची पुर्ण ताकद लावून निवडून दिला आहे. गतवेळेवीपेक्षा जास्त मताधिक्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच मि निवडणूक लढविणार आहे. होउ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत समविचारी आघाडी आपली यशस्वी परंपरा कायम ठेवील. गतवेळी श्रीपतपिंपरी जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यात आम्ही वेळो वेळी पुर्ण ताकदानिशी मदत केली आहे. नवीन तयार झालेल्या मालवंडी जिल्हा परिषद गटात पूर्वीचीच सर्व गावे आहेत. आणि सेंद्री मालवंडी, श्रीपतपिंपरी,तडवळे, सुर्डी, आणी त्या परिसरातील गावांचा याआधीपासून माझा या गावातील जनतेच्या कामानिमित्त सतत संपर्क राहिला आहे.या सर्व अनुकूल बाबींचा विचार केला असता आगामी मालवंडी जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही अत्यंत सोपी आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत लढवून ती जिंकूनच दाखविणार असल्याचेही यावेळी रेखा सूर्यकांत चिकणे म्हणाल्या.
0 Comments