वैराग! लोकांकडून पैसे का घेता असे विचारल्यामुळे पतीने केली पत्नीला सुऱ्याने मारहाण


वैराग/प्रतिनिधी:

तुम्ही लोकांकडून पैसे का घेता असे विचारल्याचा रागातून म्हणून पत्नीच्या मनगटावर सुऱ्याचा वार करुन तिला काठीने मारहाण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील मुंगशी येथे घडला. 

यासंदर्भात जया सोमनाथ भोसले (वय २५) रा. मुंगशी (आर), ता. बार्शी हिने वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे. दि. २८ जुलैच्या रात्री दहाचे सुमारास तिचे पती घरी आल्यावर तिने पतीला, मालेगांवमधील कुणीतरी अनोळखी इसम घरी येऊन पैसे मागत होता. तुम्ही त्याच्याकडून पैसे आणले होते का, तुम्ही लोकांकडून पैसे का घेता असे विचारले.

याचा राग येऊन तिच्या पतीने शिवीगाळी करुन घरात असलेल्या मटन कापण्याच्या सुरा तिच्या हातावर मारला, तो तिच्या मनगटावर लागला, तसेच घरातील काठी घेऊन मारहाण केली. तिचा आरडाओरडा ऐकून सासू, सासरे व नणंदेने त्यांचे भांडण सोडविले. त्यावेळी तिच्या पतीने पुन्हा परत कधी पैशाचे विचारले तर जीवे मारीन अशी धमकी दिली. याबाबत वैराग पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments