मालवंडी मध्ये उसने पैसे मागितले म्हणून एका कुटुंबीयांना लोखंडी गजाने मारहाण; सहा जणांवर गुन्हे दाखल


महालिंग केरबा थोरात वय 45 वर्षे, जात हिंदू धनगर, धंदा शेती रा. मालवंडी ता.बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा पुतण्या दत्तात्रय कालीदास थोरात हा गणेश धुळा भिसे यांचे घरी उसने पैसे मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी पुतण्या दत्तात्रय यास तु आमच्या घरात का आला असे म्हणून गणेश धुळा भिसे याने त्याला शिवीगाळ करुन डाव्या पायावर लोखंडी गज मारुन पाय मोडला तसेच आम्ही आमचे घरासमोर दुपारी 02वा. चे सुमारास बसलो असताना माझा भाऊ ज्योतीराम यास प्रल्हाद दत्तात्रय भिसे याने लोखंडी गज डाव्या कानाचे वर डोक्यात मारुन गंभीर जखमी केले आण्णा दत्तात्रय भिसे याने त्याचे पाठीत, डाव्या पायावर काठीने मारले.

 दगडू धुळा भिसे याने माझ्या डाव्या आकाळावर व डोळ्यावर जोरात हाताने मारले व डाव्या पायाच्या पिंडरीवर व डाव्या खुब्यावर काठीने मारले.त्यावेळी माझी पत्नी लक्ष्मी, आई शहाबाई व मुलगा महेश सोडवण्यासाठी मध्ये आले असता माझ्या पत्नीला धुळा नारायण भिसे याने डकलून देवून रस्सीने उजव्या खांद्यावर मारले तसेच आई शहाबाई हिला आण्णा दत्तात्रय भिसे याने कमरेवर दगड मारला व मुलगा महेश यास गणेश धुळा भिसे याने लाथाबुक्क्यांने कपाळावर व छातीवर मारुन माझा पुतण्या दत्तात्रय कालीदास थोरात याचे नावे असलेली मोटार सायकल नं.MH13BN9146 ही माझ्या घरासमोरुन त्याचे घराकड घेवून गेला व पेटवून 20,000/- नुकसान केले आहे. म्हणून माझी 1 ) गणेश धुळा
भिसे,2)दत्तात्रय नारायण भिसे, 3 ) धुळा नारायण भिसे, 4 ) दगडू धुळा भिसे, 5) प्रल्हाद दत्तात्रय भिसे, 6) आण्णा दत्तात्रय भिसे सर्व रा. मालवंडी ता.बार्शीबयांचेविरध्द तक्रार आहे. 
भारतीय दंड संहिता १४३, १४७, १४८ , १४९, ३२३, ३२६
३२४, ५०४ ४२७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments