उस्मानाबाद! बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कळंबच्या तत्कालीन तहसीलदार विरोधात गुन्हा



बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कळंबच्या तत्कालीन तहसीलदार वैशाली पाटील  यांच्या विरोधात कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्या मुळे खळबळ उडाली आहे. मालमत्तेच्या चौकशीबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी सांगितले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी २००८ ते २०१६ या कालावधीत तत्कालीन तहसीलदार वैशाली पाटील यांनी उत्पन्नापेक्षा जास्त २२ लाख रुपयाची अधिक संपती जमवली होती. 

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आली होती. अवैध मार्गाने कमावलेल्या संपती बाबत चौकशी करन्यात आली होती. बेहिशोबी त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी व्हावी, यासंबधी लाचलुचपत प्रतिबंक विभागाचे अधीक्षक डॉ राहुल खाडे, आप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांच्याकडून तत्कालीन तहसीलदार श्रीमती पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये ज्ञात उत्पन्नाचे स्त्रोतापेक्षा एकूण २२ लाख ४ हजार ३३७ रुपयांची असंपदा (बेहिशेबी मालमत्ता) असून त्याचे प्रमाण २९ टक्के असल्याची माहिती पुढे आली. या संबंधीची सर्व चौकशी पूर्ण करून श्रीमती पाटील यांच्या विरोधात सरकारतर्फे पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम  प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे करत आहेत.

Post a Comment

0 Comments