साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु मागील काही दिवसांपासून आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत होती. यावर्षी ऑक्टोबरमध्ये सामंथा रुथ प्रभुने नागा चैतन्यशी घटस्फोट घेतला होता. आता हे कपल वेगळं झालं आहे. घटस्फोटानंतर सामंथा आपल्या जीवनात पुढे गेली आहे. दरम्यान, नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सामंथा गोव्यात गेलीय. तिने फोटो पोस्ट करून #goayoubeauty असा हॅशटॅग लिहिलाय.
आपल्या मैत्रीणींसोबत ती गोव्यामध्ये फिरायला गेलीय. काही दिवनसांपूर्वी ती हिमायलात गेली होती. आता गोव्यात मैत्रीणींसोबत न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी गेलीय. गोव्यातील टाईम स्पेन्ड करतानाचे तिने आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती मोनोकनीमध्ये दिसतेय. ब्लू प्रिंटेड मोनोकनीमध्ये तिचा ग्लॅमरस लुक दिसतोय. या फोटोसोबत तिने हार्ट इमोजी शेअर केला आहे.
तिच्या सौंदर्याचं कौतुक होतंय. तिच्या चाहत्यांनी सामंथाच्या फोटोवर हार्ट इमोजीसोबत कॉम्प्लीमेंट दिलीय. काहींनी त्यांना अशीचं पुढे जात राहा असे कमेंट्स दिले आहेत. हिंमत हारू नको, अशीही कमेंट काही नेटकऱ्यांनी दिलीय. सामंथाने इन्स्टाग्रामवर आपल्या मैत्रींणींचे फोटोदेखील शेअर केले आहेत. या अभिनेत्रीने ख्रिसमस देखील आपल्या मैत्रीणींसोबत साजरा केला. सामंथाच्या हाती एक मोठा चित्रपट आहे. त्या चित्रपटाचे नाव अरेंजमेंट्स ऑफ लव्ह आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन बाफ्टा ॲवॉर्ड विजेते दिग्दर्शक फिलिप जॉन करत आहेत. याची माहिती स्वत: सामंथाने एका पोस्टच्या माध्यमातून दिली होती. या चित्रपटाचे प्रोडक्शन सुनीता टाटी यांचे प्रोडक्शन हाउस गुरु फिल्म्स करेल.
0 Comments