कौतुकास्पद! रणजीत महादेव पाटील स्वच्छता अभियान तृतीय पुरस्कार प्रदान


[ स्वच्छ भारत समर इंटरंशिप जिल्हा तृतीय पुरस्कार सन ( २०१९ /२०२०) पुरस्कार ]

परंडा प्रतिनिधी  - 
दि.१५  परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथील युवा शेतकरी बचतगट सचिव तथा श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांना स्वच्छ भारत समर इंटरंशिप जिल्हा तृतीय पुरस्कार सन ( २०१९ /२०२०) पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज नेहरू युवा केंद्र  मध्यवर्ती इमारत उस्मानाबाद येथे प्रदान करण्यात आला.
 स्वच्छता व पेयजल मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने दिला जाणारा स्वच्छता अभियाना वर काम करणाऱ्या व्यक्ती,संस्था यांना देण्यात येतो. दि १५ डिसेंबर  २०२१ रोजी सन (२०१९/२०२०) चा जिल्हा तृतीय पुरस्कार  रणजीत महादेव पाटील यांना भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री नितीन काळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मा.श्री धनंजय काळे , कार्यक्रम अधिकारी नानासाहेब पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस रामचंद्र कुलकर्णी यांच्या  हस्ते प्रदान करण्यात आला.
२०१९/२०२० मध्ये परंडा तालुक्यामध्ये रस्ते स्वच्छता, सामूहिक स्वच्छता, घनकचरा,  स्वच्छता जनजागृती रॅली,  स्वच्छता जनजागृतीपोस्टर लावणे, स्वच्छता जनजागृती भिंती रंगवणे, शाळेमध्ये सामूहिक स्वच्छता, स्वच्छतेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे,
 स्वच्छतेविषयी जनजागृती करून स्वच्छता प्रभात फेरी काढणे ,शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन करणे अशा अनेक कामाचा आढावा घेऊन सन (२०१९/२०२०)चा जिल्हा तृतीय पुरस्कार रणजीत महादेव पाटील  यांना आज विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार संस्थेला मिळाल्यामुळे पाटील यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments