बार्शी/प्रतिनिधी:
गुन्ह्यातील आरोपी नागेश श्रीमंत चव्हाण व सोमनाथ संपत कदम हे दोन्ही आरोपी त्यांचे राहते घऱी मिळून आल्याने त्यांना नमुद गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतले, इतर दोन आरोपीचा बार्शी शहर पोलिस शोध घेत असताना कॅन्सर हॉस्पिटल चौकात एक इसम पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना दिसला. विनापरवाना त्याने शास्त्र जवळ बाळगले होते म्हणून त्याच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर हॉस्पिटल चौकामध्ये एक इसम पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना आढळून आला, पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो जोराने पळू लागला. पकडून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक तलवार आढळून आली. पोलीस स्टेशन मध्ये आणून त्याला नाव विचारले असता दिपक सुनील आलाट (वय 21) रा. बापू वाणी विटभट्टी जवळ, बार्शी असे सांगितले. तलवारी सारखे घातक हत्यार त्याच्या ताब्यात ठेवल्याने तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याने त्याच्या विरूध्द शस्त्र अधिनियम चे कलम 4(25), सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम चे कलम 37(1), 135 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments