भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसतोय. चेन्नई सुपर किंग्जला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिल्यानंतर आगामी स्पर्धेपूर्वी महेंद्रसिंह धोनी सध्या कुटुंबियांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर त्याच्यापेक्षा खूपच सक्रीय असून ती वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो शेअर करत असते. आताही साक्षीनं एक खास फोटो शेअर करुन आपल्या नात्यातील अनटोल्ड स्टोरी शेअर केली आहे.
साक्षी धोनीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक फोटो शेअर केलाय. आमच्या भेटीला १४ वर्षे पूर्ण झाली. डिसेंबरमध्ये आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो, अशा कॅप्शनसह तिने धोनीसोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये धोनी ब्लॅक सूटमध्ये स्माईल करताना दिसतोय. तर साक्षी धोनीच्या पाठिमागे उभी असल्याचे पाहायला मिळते. साक्षी धोनीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
मुळची डेहराडूनची असलेली साक्षी आणि रांचीचा महेंद्रसिंह धोनी या दोघांनी ४ जुलै २०१० मध्ये विवाह केला होता. त्यावेळी साक्षी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होती. ती कोलकाता येथील ताजमध्ये ट्रेनी म्हणून कार्यरत असताना धोनी तिला भेटला होता. दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. पण ही भेट त्यांच्यासाठी खास होती. १० वर्षांच्या अंतराने दोघे भेटली होती. त्यानंतर दोघांच्या मैत्री पुन्हा फुलली. दोन वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी एकमेकांसोबत नवी इनिंग सुरु करण्याचे ठरवले. साक्षी आणि धोनीला एक मुलगी आहे. २०१५ मध्ये साक्षीनं झिवाला जन्म दिला होता. त्यानंतर आता आणखी एकदा धोनीच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून त्याची फटकेबाजीचा आनंद चाहत्यांना घेता येणार आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने धोनीलाही रिटेन केले आहे.
दिशा पाटनीच्या बोल्ड लूकने वाढला इंटरनेटचा पारा!
अष्टपैलू रविंद्र जाडेजा हा चेन्नईकडून रिटेन होणारा सर्वात पहिला खेळाडू ठरला. त्यामुळे धोनीपेक्षा त्याला अधिक रक्कम मिळाली. जाडेजाला नियमावलीनुसार १६ कोटी मिळाले. धोनीला रिटने करण्यासाठी चेन्नईने १२ कोटी मोजले. हा निर्णयातही धोनीचा मोठा हात होता, असे बोलले जाते. भविष्याचा विचार करुन धोनीनेच जाडेजाला पुढे आणल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
0 Comments