पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर येथील संत नामदेव महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. पंढरपूर रेल्वे मैदानावर केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखी मार्गाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २२१ किलोमीटर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३० किलोमीटर लांबीच्या पालखी महामार्गाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते संबोधणार आहेत तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, व्ही के सिंग यांच्या हस्ते बारा हजार कोटी रुपयांच्या पालखी महामार्गाचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे बाराच्या सुमारास पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार खासदार हे उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमंत्रण पत्रिकेतून वगळले..
राज्यातील वारकरी संप्रदायाचा पंढरी चा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पंढरपूरला जोडणारे आठ पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचे कार्यक्रम केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून हाती घेण्यात आला होता या कार्यक्रम पत्रिकेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना कोणत्याही प्रकारचे स्थान भारतीय जनता पार्टी कडून देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.
0 Comments