वैराग/प्रतिनिधी:
सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक कार्याचे जाळे पसरवणाऱ्या नागेश अभिमन्यू चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पक्ष कार्यालयात गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला.
बार्शी तालुक्यातील जवळगावचे रहिवासी असलेल्या नागेश चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. बार्शी तालुक्यातील अनेक प्रश्नांवर आंदोलने केली आहेत.वैराग भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या राष्ट्रवादीमधील पक्ष प्रवेशाने बार्शी तालुक्यासह राज्यातील विविध भागामध्ये राष्ट्रवादी पक्षाला बळ मिळणार आहे.सध्या नागेश चव्हाण हे सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेच्या राज्यातील शंभराहुन अधिक शाखांमधून सामाजिक कार्य करीत आहेत.
सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेसोबत जनशक्ती संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्षपद, मानव संसाधन विकास संस्था ह्यूमन राइट्स या संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपद, छावा संघटनेचे राज्य सचिवपद संभाळत असून कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे.यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सुनिल तटकरे, आमदार शेखर निकम, सुमनताई पाटील, दिपक साळुंखें, राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजी गर्गे, आनंद परांजपे, बंडू शेटे, राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर, स्वाती चिटणीस, राजू आडगळे, रोहीत बेलदारे, महेश साळुखें, पवन श्रीमाळ, दत्ता मस्के, गणेश भोसले, बापूसाहेब वाघमारे, सोमनाथ चव्हाण, दिनेश साळुंखे, अजिंक्य गायकवाड, संदेश कापसे, सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments