कामगारांच्या स्मार्ट कार्डसाठी आंदोलन, बार्शी कामगार ऑफिसला घेराव



बार्शी/प्रतिनिधी:

 घरेलू कामगार व बांधकाम कामगार यांचे स्मार्ट कार्ड,पावती देण्याबाबत व कामगार आयुक्त सोलापूर ऑफिस बाहेर कामगार आयुक्त सोलापूर व सहकारी कामगार अधिकारी बार्शी यांच्याविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा देण्याच्या मागणी साठी आज बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार यांच्या जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय,जनशक्ती मजदूर सभा, मातंग पॅथर सेना, अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती,दलित पॅंथर बार्शी,माथाडी संघटना, महिला आघाडी सेना आणि बचत गट संघटना कडून सहकारी कामगार अधिकारी यांच्या बार्शी कामगार ऑफिसला घेराव घातला. यावेळी आमदार -खासदार योजना द्या, आयुक्त - अधिकारी योजना द्या,मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री योजना द्या, अशा घोषणानी कामगार ऑफिस दणाणून सोडले.
            (Advertise)

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय,परिवर्तन फाऊंडेशन च्या स्मिता देशपांडे व बार्शी मधील अनेक कामगार संघटना मिळून चार महिने बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार यांची नोंदणी करत आहेत त्याच्या पोचपावत्या सुद्धा ऑनलाइन त्यांना मिळालेले आहेत.परंतु कामगार आयुक्त सोलापूर आणि सहकारी कामगार अधिकारी बार्शी हे आपली संविधानिक जबाबदारी पाळत नसून एकमेकांकडे ढकलण्याचे काम चालू आहे असा आरोप मनीष देशपांडे यांनी केला.तसेच हे तर योजनेची ऑनलाईन नोंदणी झाल्या तरीही कामगारांना योजना मिळत नाही हे संविधानाचे उल्लंघन आहे.

(Advertise)

हे कामगारांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन असे जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे बार्शी मधील निलेश मुद्दे आणि सुरेश चकोर म्हणाले. सहकारी अधिकारी कांबळे यांची सकारात्मक चर्चा झाली असून आयुक्तांनी पाच तारखेला सोलापूरला मीटिंग ठेवली असून तिथे कामगारांच्या नोंदणीची रणनीती ठरवली जाईल तसेच नोंदणी पूर्ण होण्याचेलेखी आश्वासन मिळेल असे सोलापूर कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी सांगितले.अविनाश कांबळे, विष्णू थोपडे, नागरबाई चौधरी, विजा पवार,अर्चना झिंगाडे, महानंदा पवार, वैशाली घोरपडे अनेक महिला शक्ति आंदोलनमध्ये सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments