सीना कोळेगाव धरणांतील अतिरिक्त पाणी नेरले पाझर तलावात व आनाळा उपससिंचन प्रकल्पात सोडावे : सतीश नीळ-पाटील


परांडा/प्रतिनिधी:

करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील शेतकऱ्यांची जल वरदायनी म्हणून उपयुक्त असलेले सिना कोळगाव धरण १००%भरलेले आहे, त्यामुळे अतिरिक्त पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. ते वाया जाणारे पाणी नदी पात्रात सोडण्या ऐवजी नेरले पाझर तलावात व आनाळा उपसा सिंचन प्रकल्पात सोडावे अशी मागणी सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील व नेरलेचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले पाटील यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

(Advertise)

श्री नीळ व पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की,सिना कोळगाव प्रकल्प जलाशयात १००% जलसाठा झाला आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. ते पाणी वाया जात आहे. तसेच सिना कोळगाव मधील ज्या वेळी पाणी साठा कमी होत असतो त्यावेळी नेरले पाझर तलावात  व आनाळा उपसा सिंचन योजना चालू करून पाणी सोडण्याची मागणी केली जाते व पाणी सोडले जाते त्यामुळे आम्हा धरणग्रस्त शेतकऱ्यांना विनाकारण त्रास होत असतो. त्यावेळी विनाकारण राजकीय दबाव तंत्राचा वापर करून काही लोक मुद्दाम पाणी सोडण्याची मागणी करत असतात. त्यामुळे आमच्या धरणग्रस्त भागांतील शेतकरी बांधव यांचे वर अन्याय होत असतो.व आमची घरे व शेती बुडीत झालेल्या असतानाही आमच्याच पिकांना पाणी मिळत नाही. पर्यायाने धरणग्रस्त शेतकरी व इतर लोक यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता असते. 

(Advertise)

 त्यामुळे आत्ता अतिरिक्त वाहून जाणारे पाणी नदी पात्रात न सोडता नेरले पाझर तलावात व आनाळा उपसा सिंचन योजनेत सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. व  आपण आपल्या स्तरावरून सर्व सबंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. अन्यथा ऐन वेळी  आम्ही आमच्या हक्काचे पाणी इतरत्र कुठेही सोडू देणार नाहीत याची प्रशासनाने नोंद घ्यावी असेही सतीश नीळ पाटील यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग उस्मानाबाद, कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग परंडा, तहसीलदार करमाळा यांना देण्यात आलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments