सोलापूर:
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलात अपर पोलीस अधीक्षक म्हणुन कार्यरत असलेले आणि आता रायगड येथे बदली झालेले अतुल झेंडे यांनी कोवीड कालावधी आणि वारी बंदोबस्ता दरम्यान दिलेल्या उल्लेखनीय सेवेच्या योगदानाबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रयमामा भरणे यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर, शिस्तप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूरचे आयुक्त पी. शिवशंकर आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वृंद उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना पालकमंत्री ना.दत्तात्रयमामा भरणे यांनी " अतुलराव यापुढील काळात आपण अधीक्षक पदावर सोलापूरला या" अशा आपुलकीच्या शब्दात त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कामाबद्दल सूचक पसंती दर्शवली.
0 Comments