राज्यात गेल्या दिवसांपासून करूणा शर्मा खूप चर्चेत आहेत. तेव्हा करूणा शर्मा यांच्या भोवती लोकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर करूणा शर्माच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. बीडमधील वैद्यनाथ दर्शनासाठी करूणा मुंडे गेल्या होत्या. मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का?, असा प्रश्न करत परळीच्या महिलांनी करूणा शर्माला अडवण्याचा प्रयत्न केला.
करूणा शर्माच्या गाडीत आढळून आलेले पिस्तूल हे त्यांचेच आहे का? तसेच त्या पिस्तूलाचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का? याबाबतीत पोलीस अधिक तपास करीत आहेत. वैद्यनाथ मंदिराजवळ स्थानिक लोकांनी करूणा मुंडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रकरणाबाबत आता चौकशी नंतर पोलीस काय भूमिका घेतात, हे आता पहावं लागणार आहे. दरम्यान, करूणा शर्मा आज परळीत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत होत्या. परंतु पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानं आता नवीन वादाला तोंड फुटल्याचं पहायला मिळत आहे.
0 Comments