बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतिने सावळे सभागृहात बार्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी नियुक्ती पत्र व युवक मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निरंजन भुमकर यांनी केले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या भव्य कार्यक्रमास प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, निरिक्षक शरद लाड, गजानन खमितकर, अरुण असबे कार्यालयीन सरचिटणीस , प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, जिल्हा युवक अध्यक्ष गणेश पाटील,जि.प.सदस्य अतुल खरात उपस्थित होते.
यावेळी माळेगांव येथील अशोक माळी व नितीन पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त प्रवेश केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख व निरंजन मालक भुमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड विक्रम सावळे यांनी केले शहराध्यक्ष अमोल आंधळकर, अनिकेत पाटील, विक्रांत पाटील, शिवशंकर ढवण,अमर पाटील,सुरज ढमढेरे, रत्नदिप कुलकर्णी,जयंत देशमुख,सागर गायकवाड, अमोल भदे,भरत काकडे, अच्युत पवार असिफ शेख ,ताजोद्दीन बाबा शेख उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैराग शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत भालशंकर सर यांनी केले.
0 Comments