अमरावती:
खरेदी खत मिळवून देण्यासाठी वीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर अमरावतीच्या अँटी करप्शन विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. यामुळे पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर हे अमरावतीतील गाडगेनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. यांनी तक्रारदारांना खरेदी खताची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून यापूर्वी ३० हजार रुपये स्वीकारले होते. त्यानंतर लेवटकर यांनी रोहन भोपळे यांच्या मध्यस्तीने २० हजार रुपयांची मागणी केली होती. राजू लेवटकर व रोहन भोपळे यांनी तक्रारदारांकडून २० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक अरुण सावंत, संजय महाजन, एस.एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
0 Comments