सोमय्यांचे आरोप मागे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील; मुश्रीफांचा पलटवार


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील साखर कारखान्यात अजून १०० कोटींचा घोटाला केला. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सोमय्यांचे आरोप म्हणजे भाजपचे षडयंत्र असून यामागील मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील आहेत असा आरोप त्यांनी केला.

(Advertise)

सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टरमाईंड आहेत. मी अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन बोललो आहे, आवाज उठवला आहे आणि यामुळे भाजपाचे नेते मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते.

(Advertise)

मी १७ वर्षे मंत्री, आजपर्यंत एकही डाग नाही, आता तीन वर्षात मंत्रिपदाला २० वर्षे होतील.  ज्या खात्यात मी काम केलं, त्या त्या खात्यात चांगलं काम करुन दाखवलं.

Post a Comment

0 Comments