भूम/प्रतिनिधी:
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांहून अधिक काळ बोर्डला ओलांडला तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील देवंग्रा हे गाव मुख्य रस्त्याला जोडलेले नाही. वारंवार अर्ज विनंत्या करून हे कच्चा रस्त्याचे कामही पूर्ण होत नसल्याने देवंग्रा ग्रामस्थांनी ३० सप्टेंबर पासून आमरण उपोषण करत आहेत.
भूम बार्शी हा रस्ता गावापासून एक किलोमीटर तर माणकेश्वर देवंग्रा हे अंतर सुद्धा एक किलोमीटर असून गाव हे रस्ते पक्क्या रस्त्यांनी जोडलेले नाही. मागील पंधरा दिवसापासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. व देवांग्रा गावाचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. रुग्ण, आजारी लोक यांना हॉस्पिटलमध्ये पोचवण्यासाठी सुद्धा दोन किलोमीटर चिखल तुडवत मुख्य रस्त्याला यावे लागते व ते तोडून गाडी पकडावी लागते. प्रचंड पावसामुळे व विश्वरूपा नदीला आलेल्या महापुरामुळे आणि त्यातच रस्त्याच्या समस्या मुळे देवंग्रा नागरिकांना प्रचंड पश्चाताप सहन करावा लागत आहे.
आज पर्यंत लोकप्रतिनिधी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना अर्ज विनंत्या व निवेदने देऊन दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषण कर्ते भाऊसाहेब तिपाले, परसराम डोके, बापूराव बरकडे, हनुमंत खताळ, शांतीसागर बरकडे, विनोद पाटील, गोरख बरकडे व पांडुरंग डोके हे नागरिक देवंग्रा ग्रामपंचायत समोर उपोषण करत आहेत.
0 Comments