बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर कारखाना चा मनमानी कारभार समोर आला आहे, ऊस वाहतूक दानाचे गेल्या वर्षाचे पैसे देण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करत असून नकार देत आहे. कारखान्याच्या मनमानी कधी थांबणार कारखान्यावर प्रशासन कधी कारवाई करणार? ह्या आशयाचे बार्शी तहसील कडे तक्रारी दाखल करण्यात आलेले आहेत.
शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले कारखानदार हे मात्र ऊस वाहतूक दाराचे बिले व शेतकऱ्यांची बिले देण्यास टाळाटाळ करत आहेत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शेतकरी व वाहतूकदार रामा अंकुश कावरे, उद्धव भागोजी चव्हाण, दत्ता बेर्डे, बळीराम अभिमन्यू बोरडकर, दत्ता चव्हाण यातील काही लोकांनी गेल्या वर्षी इंद्रेश्वर शुगर साठी ऊस वाहतूक केली होती. कारखान्याने आजचा काय कोणतेही पैसे दिले नाहीत स्थानिक प्रशासनाचे आदेश द्यावेत आता आम्ही कारखान्यासमोर आत्मदहन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे, पैसे मागितल्यावर कारखाना प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देऊन धमक्या देत आहेत.
0 Comments