नेरले येथील माजी सरपंच श्री. औदुंबरराजे भोसले पाटील यांचे वडील कै शंकरराव( क्रांतिवीर बबननाना) भगवानराव पाटील यांचे आज दिनांक ३०/०८/२०२१आज वार सोमवार या दिवशी यशवंतराव चव्हाण हाँस्पीटल पुणे येथे उपचार घेत असताना दुःखद निधन झाले आहे ते ८५ वर्षाचे होते, ते नेरले आणि परीसरातील नामांकित पहीलवान म्हणून प्रसिद्ध होते,क्रांतिवीर नाना पाटील याच नावाने ओळखले जात असत.
तसेच माजी आमदार रावसाहेब पाटील,माजी सभापती पद्माकर झानपुरे, माजी मंत्री दिगंबरराव बागल, निमगाव हवेलीचे सरपंच मधुकरराव नीळ, यांचे सहकारी म्हणून काम केले आहे,तसेच ते सातवी पासवरुन शिक्षक होते,परंतु नोकरी न करताच नोकरीचा राजीनामा दिला होता,ते पहिलवान असुन ही धार्मिक विचारांचे होते, पक्वाज,तबला,पेटी वादक व गायक होते,तरी त्यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच माती सावडण्याचा कार्यक्रम वार बुधवार दिनांक ०१ /०९/२०२१ या रोजी गाव नेरले येथे सकाळी ७.३० वाजता करण्यात येणार आहे.
0 Comments