४८ तासात सराईत गुन्हेगारांना अटक बार्शी पोलीसांची दमदार कामगिरी


बार्शी/प्रतिनिधी:
      
 बार्शी शुक्रवारी मध्यरात्री बार्शी शहरातील सात ते आठ दुकानावर चोरांनी डल्ला मारला होता.  बॅरन्ड लुट ब्रँडेड रेडीमेड गारमेंट ६७,०००आपटे मेडीकल ४००० सुरज गारमेंट ४०००,पिकाॅक लाईफ स्टाईल ७९,०००, जी एम ट्रेडर्स ४०००, रोहीत एजन्सी ७०,०००० , बगले मेडीकल १८,००० सात दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली असून २,४६,००० रू कि रोख रक्कम, जीन्स पॅन्ट व लेडीज ड्रेस चोरीस गेलेली होती. 

चार ते पाच जणांची टोळी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान चोरी करत असल्याचे CCTV त निदर्शनास आले होती. 

याच्या आधारे तपास सुरू केला सदर गुन्ह्याचा तपास पुणे लातूर सोलापूर या भागात चालू असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास मुंबई येथील आरोपी निष्पन्न झाले या अनुषंगाने दोन टीम नवी मुंबई येथे तात्काळ जाऊन खालील आरोपीला ताब्यात घेतले आहे त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यामध्ये निष्पन्न झाले आहेत.

१ मारूती चंद्रशेखर दासर, वय २७,रूम नंबर ४९३ रा हनुमान नगर महापे ठाणे बेलापुर नविन मुंबई. 

२ महेंद्र उर्फ मोट्या अविनाश पाटील, वय २५,रूम नंबर ३१३ रा हनुमान नगर महापे ठाणे बेलापुर नविन मुंबई .

३ अभिजीत गौतम कांबळे वय २४,रा.सेक्टर ५ कोपरखैरने मयुर बारच्या समोर नवीन मुंबई. 

४ अजय अर्जुन कानगुलकर वय २२,रा सेक्टर नंबर २३,रूम नंबर ११८ गणेश पंचमी सोसायटी नविन मुंबई. 

यांनी रिट्स गाडीमधून येऊन  बार्शी शहरात घरफोड्या केल्या आहेत त्याच दिवशी आदल्या दिवशी बारामती कुर्डूवाडी टेंभुर्णी या भागात चोऱ्या केलेल्या आहेत. सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

 सदर आरोपी नवी  मुंबई ठाणेतील सराईत गुन्हेगार आहेत .यातील आरोपी अविनाश पाटील हा तुर्भे  पोलीस ठाण्यात तडीपार आहे सध्या तो वाशी पोलिस ठाण्यास हवा आहे. वरील आरोपीवर नवी मुंबई ,ठाणे ,रायगड या जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी आहेत .आरोपी मारुती चंद्रशेखर दासार यांचे ०२ गुन्हे ,महेंद्र उर्फ मोठे अविनाश पाटील यांच्यावर ३६ गुन्हे, अभिजीत गौतम कांबळे यांच्यावर १२ गुन्हे,अजय अर्जुन कानगुलकर यांच्यावर ०१ गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल आहे .

सदरचा तपास हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक श्री अभिजीत धाराजी धाराशिवकर सो बार्शी विभाग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे श्री सर्जेराव पाटील बार्शी, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री आर आर शेळके ,बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी डी उदार,पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे, सहाय्यक पोलीस फौजदार वरपे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ९८  माळी, पोलीस ना १३१९ भांगे, पो.ना. ९१२ ठेंगल, पो ना ११६२ पवार ,पो कॉन्टेबल १७४८ घोंगडे, पोलीस कॉन्स्टेबल २२०८ बारगीर, पोलीस कॉन्स्टेबल ८५६ गोसावी ,पोलीस कॉन्स्टेबल ४५७ लगावल ,व सायबर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी दिवस-रात्र अथक परिश्रम करून ४८ तासात सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्चाया पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी डी उदार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments