'दीदी ओ दीदी' नाही 'जिओ दीदी'; अखिलेश यादव यांचा मोदींना टोला



 पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक आघाडी घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचं चित्रं आता जवळपास स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळालाय. 

 पश्चिम बंगालच्या निकालानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक ट्विट करत ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले अखिलेश यादव?

 उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टसोबत ममता दीदींसोबतच आपला एक जुना फोटोही आठवण म्हणून शेअर केलाय.
 या फोटोत ममता बॅनर्जी यांना आनंदाने फुले देताना ते दिसत आहेत. तर ममता बॅनर्जी या अत्यंत प्रेमाने त्यांच्या गालावरून हात टेकवताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचं घृणेचं राजकारण हाणून पाडणाऱ्या जागरुक जनता, झुंजारून ममता बॅनर्जीजी आणि तृणमूल काँग्रेसला समर्पित असणाऱ्या नेत्या-कार्यकर्त्यांचं अभिनंदन', असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

तर सोबतच, अपमानजनक कटाक्ष टाकत 'दीदी ओ दीदी' म्हणणाऱ्यांना जनतेनं दिलेलं हे दमदार प्रत्यूत्तर आहे, असं म्हणत अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान आपल्या अनेक प्रचारसभांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दीदी ओ दीदी'चा सूर लावलेला पाहायला मिळाला होता.

Post a Comment

0 Comments