"भारत संपुर्ण देशच काही आठवडे बंद का करत नाही ?" अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांचा सवाल



भारतातील कोरोना संकट पाहता संपुर्ण मदतीचा येत आहे. अशातच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनातील एक महत्वाच्या व्यक्तीने भारतातल्या कोरोना महामारीच्या संकटावर एक भाष्य केले आहे. तब्बल सात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनात मुख्य वैद्यकीय सल्लागार राहिलेल्या डॉ अॅंथनी एस फौची यांनी नुकतेच भारताविषयी केलेले एक भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

लॉकडाऊन हे कोणत्या देशाला आवडत नाही परंतु अशा ममहामारीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतात ते देशहितासाठी आवश्यक असतात. त्याचवेळी ब्रेक द चैनच्या कालावधीत काही दिवस घरीच थांबा आणि एकमेकांची काळजी घ्या असा सल्ला त्यांनी दिला आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ, बेथेस्डा, मेरिलॅंड येथून त्यांनी संवाद साधला आहे.

 जागतिक पातळीवर आरोग्याच्या बाबतीत ज्यांचा सल्ला मानला जातो अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉ अॅंथनी फौची आहेत. या ब्रेक द चैनच्या माध्यमातून कोरोना संक्रमण रोखण्याचा एक आशेचा मार्ग नक्कीच निघेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कदाचित अशा कठीण आणि मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग यातून नक्कीच निघेल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments