रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत असे बोलायला नको होते - अजित पवार


 दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. यानंतर दानवेंवर विरोधकांनी टीका केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी मत व्यक्त केले आहे. अजित पवार म्हणाले की, रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनावर असे बोलायला नको होते, असे अजित पवार म्हणाले आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने आपला हट्टीपणा सोडायला हवा आहे. केंद्र सरकारच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करतात पण तोडगा निघत नाही आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, त्यामुळे आधीचाच कायदा कायम ठेवा, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

Post a Comment

0 Comments