प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
संपूर्ण राज्यात कोरोना महामारीची भयावह परिस्थिती पाहता राज्य शासनाने जनतेचा विचार करून लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. तसेच कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी शासकीय पातळीवर कडक निर्बंध घालण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरु आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील ऑक्टो/ नोव्हें २०२० हिवाळी सत्रातील सर्व (पारंपारिक) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा तसेच डिप्लोमा, पीजी डिप्लोमा व प्रमाणपत्र परीक्षा दि. २२ मार्च २०२१ पासून महाविद्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या होत्या. तथापि मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशाद्वारे कोरोनाविषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले असल्याने दिनांक ६ एप्रिल २०२१ते दिनांक १२ एप्रिल २०२१ या कालावधीतील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या होत्या.
तदनुसार स्थगित करण्यात आलेल्या परीक्षेबाबत शासनाने जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार महाविद्यालयामार्फत (दूरशिक्षण अभ्यासक्रमासहित) घेण्यात येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या (पारंपारिक ) प्रथम वर्ष, डिप्लोमा,पी.जी. डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सच्या परीक्षा ऑनलाईन संगणीकृत प्रणाली द्वारे दिनांक १५ मे २०२१ पर्यंत घेण्यात यावेत. तसेच यापूर्वी सदर परीक्षा ज्या महाविद्यालयाकडून घेण्यात आले आहेत अशा महाविद्यालयाकडून परीक्षेचे पेपर मूल्यांकन करून सदर मार्क्स विद्यापीठाने दिलेल्या अधिकृत संगणक प्रणाली मध्ये भरून विद्यापीठास सादर करावे.
त्याचबरोबर ज्या महाविद्यालयाने परीक्षेची सुरुवात ६ एप्रिल २०२१ पूर्वी केलेली आहे त्या काळात ज्या विषयांच्या पेपर झालेले आहेत ते सर्व विषयांचे पेपर सोडून आणि ६ एप्रिल २०२१ नंतर उर्वरित विषयांचे पेपर विद्यापीठाच्या परिपत्रकामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेला होत्या. त्या काळातील उर्वरित सर्व पेपरची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावेत असे निर्देश शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्राप्त झाले आहे.
0 Comments