माघी वारी निमित्ताने विठुरायाची मंदिर दोन दिवस बंद राहणार


पंढरपूर/प्रतिनिधी:

राज्य सरकारने राज्यातील २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली प्ले आहे त्यामुळेच २२ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे मागी एकादशी यात्रा रद्द करण्यात आली आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करू नये म्हणून २२-२३ फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिर मुखदर्शनासाठी बंद असणार आहे कोणत्याही भाविकाला या दोन दिवसांमध्ये मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी संदीप समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

२२ फेब्रुवारी रोजी होणारी माझी यात्रा नियोजन संदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून आज बैठक घेण्यात आली या बैठकीला अध्यक्षस्थानी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी होते, तर कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी तर मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर संभाजी शिंदे, माधवी निगडी, शकुंतला नवगिरे ,नगराध्यक्ष साधना भोसले यांनी उपस्थित होते. माघी यात्रा संदर्भात या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला.

(Advertise)

औसेकर महाराज म्हणाले, करुणा संकट अद्यापही कमी झाली नाही. त्यामुळे आषाढी कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते, त्याचप्रमाणे मागि यात्रेला ही दोन दिवस भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. माघी दशमी आणि एकादशी या दिवशी गर्दी होऊ नये म्हणून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे मात्र द्वादशी दिवशी विठ्ठल मंदिर पूर्ववत चालू करण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल व रुक्मिणी मातीची एकादशी निमित्ताने असणारे धार्मिक विधी पूर्ण केले जाणार आहेत, तसेच ज्याप्रमाणे आषाढी व कार्तिकी वारी दरम्यान मंदिराकडून नियम केले, गेले होते तेच नियम मागे वाढीसाठी असणार आहेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद असले तरी पंढरपुरात येणारे भाविकांनी संदर्भात शासन निर्णय घेईल स्पष्ट औसेकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments