" इतिहासाचे प्रा.डॉ. दीपक चांदणे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने 'जयसिंगपूर वसाहतीचा इतिहास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:

जयसिंगपूर कॉलेजमध्ये एका अनोख्या पद्धतीने सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये  'जयसिंगपूर वसाहतीचा इतिहास' या स्वलिखित पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकराजा राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या आचार  व विचारांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
      
 
 प्रा. डॉ. डी.व्ही.चांदणे शासकीय नियमानुसार मे,२०२० मध्ये सेवानिवृत्त झाले. परंतु कोरोना महा मारीमुळे हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम औपचारिकपणे पार पडला होता परंतु कॉलेज स्थानिक व्यवस्थापन व प्राचार्य यांच्या आग्रहाखातर रखडलेला हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम  आज संपन्न झाला.
       
डॉ. दीपक चांदणे यांनी आज पर्यंत इतिहास विषयाच्या ५ पुस्तकांचे उत्तम लेखन करून २ पुस्तक लेखनासाठी सहलेखक म्हणून कार्य केले आहे. राष्ट्रीय पातळीवरचे १५ पेक्षा अधिक संशोधनात्मक पेपर सादरीकरण करून सातत्याने सामाजिक चळवळी व इतिहास या विषयाच्या अनुषंगाने असंख्य लेख व भाषणे केली आहेत. त्याचबरोबर आचार्य शांतारामबापू गरुड या राजकीय व सामाजिक विचारवंतावर एम.फील.चे मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. ते सातत्याने समाजवादी प्रबोधनीच्या माध्यमातून स्वतःला जोडून इतिहास विषयाचा अभ्यास गटाचे तज्ञ म्हणून स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. त्यांचे सुलेखन सर्वांना सुपरिचित असून त्यांच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे व्यक्तिमत्त्व व सामाजिक संवेदनशीलतेचा एक पैलू या माध्यमातून लोकांसमोर आला आहे.
     

या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे स्वागत कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी करून या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कॉलेज व प्राध्यापक यांच्यातील नोकरीच्या निमित्ताने निर्माण झालेले हे अतूट नाते व बांधिलकी  याचा विचार करून  त्यांनी केलेली ज्ञानरुपी सेवेला सन्मानित व आठवणींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर त्यांच्या लेखणीची धार सातत्याने तळपळत राहिली पाहिजे यासाठी तसेच त्यांनी लिहिलेला पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इतरांना प्रेरणादायी व्हावा हा हेतू आहे.
        
 महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक विचारवंत,ग्रामीण साहित्याचे गाढे अभ्यासक व लेखक प्रा. डॉ. मोहन पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा.डॉ. डी. व्ही.चांदणे लिखित 'जयसिंगपूर वसाहतीचा इतिहास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ.मोहन पाटील यांनी डॉ.चांदणे यांच्या इतिहास विषयाच्या लेखणी विषयी भरभरून कौतुक करून  प्रकाशित झालेले हे पुस्तक म्हणजे आजच्या तरुणांना इतिहासाचा एक मोठा ऐतिहासिक दस्तऐवज असून भविष्यामध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संदर्भग्रंथ म्हणून मार्गदर्शन ठरेल. त्याचबरोबर जयसिंगपूरचे नागरिक म्हणून प्रत्येकाला या पुस्तकाचा सार्थ अभिमान असेल असा गौरवोद्गार त्यांनी या निमित्ताने काढला.
         
 यानंतर प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. मोहन पाटील व स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांच्या शुभ हस्ते सेवानिवृत्ती निमित्ताने सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ग्रंथालय परिचर मधुकर शामराव कांबळे यांचा ही सेवानिवृत्ती झाल्यामुळे  सपत्नीक मोठा सत्कार करण्यात आला. यानंतर  उपस्थितांपैकी प्राचार्य प्रा.डॉ. बी.व्ही.ताम्हनकर ,प्रा.डॉ. प्रभाकर माने,भास्कर आवळे, प्रदिप चांदणे व कुलकर्णी सर  यांनी प्रा. डॉ. चांदणे यांच्या विषयी आपल्या आनंददायी अनुभव, त्यांचं मिळालेल्या सहकार्य व त्यांचे उल्लेखनीय कार्य या विषयी भाष्य केले व भरभरून शुभेच्छा दिल्या.
           

या सेवानिवृत्तीच्या सत्काराला उत्तर देताना प्रा.डॉ.चांदणे म्हणाले की, या संस्थेने एका अत्यंत सामान्य कुटुंबातील एका मुलग्याला नोकरीच्या माध्यमातुन स्थान दिले आणि वैयक्तिक माझ्या आयुष्यात येणाऱ्या सुख -दुखा:ना त्या त्या काळातील  संस्थेचे अध्यक्ष, सदस्य व प्राचार्यानी आधार दिला दिला. त्याचबरोबर कॉलेजचे सहकारी प्राध्यापकांनी दिलेली मोलाची साथ तसेच प्रशासकीय कर्मचारी यांचे मिळालेले सहकार्य यामुळे या कॉलेजमधील माझे शैक्षणिक अध्यापनाचे आयुष्य अत्यंत आनंदी व समाधानी गेले. त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे काही पुस्तकांचे लिखाण माझ्या हातून  शक्य झाले तसेच माझे आई-वडील, माझे बंधू व कुटुंबीयांनी दिलेली साथ यामुळे मी नोकरीचा कार्य व्यवस्थित व समाधान पूर्वक पूर्ण करू शकलो. माझ्या हातून जे विद्यार्थी घडले ते विद्यार्थी आजही मला गुरु मानून सहकार्य व मानसन्मान देत असतात. त्यामुळे मी आज खूप आनंदी असून आपल्या सर्वांच्या ऋणात राहण्यास मी पसंत करेन. यापुढेही माझ्या लेखणीचा काम पुढे चालू राहील अशाप्रकारे भावनिक भाष्य करून ते अत्यंत भावूक झाले होते.
        या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे आपल्या अध्यक्षीय अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की डॉ. चांदणे यांचे शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असून सेवानिवृत्तीचे औचित्य साधून एका ऐतिहासिक पुस्तकाची निर्मिती करणे हे प्रत्येक प्राध्यापकासाठी एक आदर्श घेण्यासारखा आहे अशा प्रकारचा गौरव उद्गार याप्रसंगी काढले. त्याचबरोबर मधुकर कांबळे यांनी ग्रंथालय परिचर म्हणून केलेलं उत्तम कामाचे भरभरून कौतुक केले. त्यांना या निमित्ताने भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
       
सदर कार्यक्रमास जयसिंगपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षा डॉ.नीता माने ,स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, जिनेन्द्र दत्तवाडे मामा, बाळासाहेब इंगळे ,आदिनाथ नरदे, अशोक मादनाईक हे मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर कॉलेजचे सर्व आजी-माजी प्राध्यापक वृंद, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम, संजय चावरे,इतर प्रशासकीय कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फलक लेखन डॉ. महावीर बुरसे व आभारप्रदर्शन उपप्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी मानले.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चौगुले यांनी सुंदर रित्या केले.

Post a Comment

1 Comments