पंढरपूर तालुक्यात स्थलांतरित पक्षाचा संशयास्पद मृत्यू


 पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील कासार ओढामध्ये स्थलांतरित करणाऱ्या या पक्षाचा बर्ड फ्लू सदृश्य मृत्यू रोगामुळे झाला आहे गेल्या आठ दिवसांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांची मारण्याची संख्या तीन झाली आहे संशय प्रस मृत्यू झालेल्या पक्ष्यांचा बर्ड फ्लू संदर्भात अहवाल येणे, बाकी आहे पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे सतरा कोंबड्यांचा फ्लूमुळे मृत्यू झाला होता, त्यामुळे आता स्थलांतरित पक्षातही बर्ड फ्लूची लागण झाल्याची भीती व्यक्त केली आहे.
(Advertise)

पंढरपूर तालुक्यातील गादेगांव, वाखरी येथील  कासाळ ओढा तसेच पंढरपूर शहरातील यमाई तलाव परिसरात विविध रंगाच्या छटा असलेले स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने पहावयास मिळतात. रंगित करकोचा हा दिसायला अंत्यंत आकर्षक व देखणा असुन मासे हे त्याचे प्रमुख खाद्या आहे. राज्यामध्ये र्ब्डफ्लूचे सावट आहे. बुधवार ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कासाळ ओढ्याजवळ व ओढ्यातील एकाच विहिजवळ रंगित करकोचा मृत्य पावल्याचे आढळले. सलग दुसर्‍या दिवशी संशयास्पदरीत्या या पक्षाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. 

(Advertise)

एक मृत पक्षी वनविभागाचे वनपाल सुनिता पत्की या स्वत: पुणे येथे तपासणीसाठी घेवून गेल्या.  पुणे येथून तो पक्षी अधिकच्या तपासणीसाठी भोपाळकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्रलंबित आहे. परंतु सोमवारी पुन्हा संशयास्पदरित्या तिसरा पक्षी मृत आढळून आला आहे. जो पर्यंत पहिल्या पक्षाचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्श काढणे शक्य नसल्याचे पशुधन विकास आधिकारी डॉ. प्रविण खंडागळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह ओढ्यालगतच्या शेतकर्‍यांची चिंता मात्र चांगलीच वाढली असून अहवालाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments