पंढरपूर/प्रतिनिधी;
पंढरपूरच्या मुख्य बाजारपेठेत मोबाईल चोरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातून ताब्यात घेतली आहे. त्यांच्याकडून दोन लाख १७ हजार किमतीचे २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
पंढरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमकार सतीश कळसकर राहणार पंढरपूर यांचा मोबाईल दसरा निमित्ताने फुले घेण्यासाठी गेले असता पंढरपूर येथील मुख्य बाजारपेठेतून कळसकर यांचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पंढरपूर पोलीस येथे दिली होती पंढरपूर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला.
पंढरपूर पोलिसांकडून तपास सुरू होता. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल हा कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात नेटवर्क दाखवत असल्याचे सायबर पोलीस ठाण्याकडून माहिती मिळाली. शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व टिमकडून कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात जाऊन तपास केला असता. फिर्यादीचा मोबाईल विधी संघर्षग्रस्त बालकाकडे मिळून आला. सदर मोबाईल जप्त करून विधिसंघर्षग्रस्त बालकाकडे अधिक चौकशी केली असता. दोन लाख १७ हजार किमतीचे २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण पवार, उपनिरीक्षक आर.जे गाडेकर यांनी कामगिरी केली.
0 Comments