माळशिरस, मंगळवेढा तालुक्यात स्वाभिमानी कडून रस्ता रोको आंदोलन


मंगळवेढा/प्रतिनिधी:

केंद्र सरकारने तीन कृषी विधायक मंजूर केले आहे. त्याच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे पुणे ते पंढरपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच मंगळवेढा येथील स्वाभिमानीचा कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको करण्यात आला. स्वाभिमानी कडून कृषी कायदे तत्काळ मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली.

(Advertise)

माळशिरस स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरूद्ध जे काळे कायदे केले आहेत. कृषी कायद्याविरोधात वेळापूर येथे रस्ता रोको करण्यात आला आहे. ते तत्काळ मागे घ्यावे. जर केंद्र सरकारने तत्काळ कृषी कायदे मागे न घेतल्यास स्वाभिमानी कडून अजून तीव्र आंदोलनाचा इशारा बोरकर यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मंगळवेढा येथे राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा सांगोला महामार्गावर दुपारी साडे अकराच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन केले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments