जन्मजात अंधत्व असणाऱ्या राहुलला परदेशी शिक्षण आर्थिक मदतीची गरज


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव खेडेगावांमध्ये लहानपणापासून अंधत्व असणाऱ्या राहुल गाजरे याने विषारी व संशोधन वृत्तीच्या जोरावर युके येथील ससेक्स विद्यापीठ प्रवेश परीक्षेमध्ये स्थान मिळवले आहे. मात्र राहुल हुशारीला आता आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.

शासनाने शिक्षण हक्क कायदा करून प्रत्येकाला तो अधिकार मिळवूनही दिला आहे. याच अधिकाराच्या जोरावर पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव छोट्याशा खेडेगावात जन्मतात पूर्णतः आंधळा असणारे राहुल गाजरे यांनी प्रतिष्ठेची समजली जाणारी युके येथील ससेक्स विद्यापीठात संगणक पदवीसाठी निवड झाली. मात्र राहुलच्या पुढील शिक्षणासाठी वर्षाकाठी ३५ लाख खर्चा असणार आहे मात्र घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे राहुल हा खर्च न परवडण्यासारखा आहे त्याला आता काही सामाजिक संघटनेकडून आर्थिक मदतीची नितांत गरज निर्माण झाली आहे.

(Advertise)

राहुल गजरे बोलताना म्हणाली, जन्मजातच अंधत्व त्यात घराची परिस्थिती बेताची होती वडील मोलमजुरी करून आम्हा दोन्ही भावांना बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यातील एक भाऊ पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर राहुल हा दहावीला उत्तम गुण मिळूनही विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला नाही, मात्र राहुल ने सर्व स्तरातून प्रयत्न करुनही त्याला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला नाही. त्याने वाणिज्य बारावी चे शिक्षण पूर्ण केले त्यातही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला लहानपणापासूनच राहुल चा ओढा हा संगणक क्षेत्राकडे होता, यातूनच त्याने युके येथील प्रतिष्ठेची समजली जाणारी आइ एल टी ही पूर्व परीक्षा दिली, आणि तो पासही झाला. मात्र विद्यापीठ प्रवेश घेण्यासाठी राहुल ला  पस्तीस लाखांची वर्षाकाठी गरज आहे त्यातूनच त्याचे शिक्षणही पूर्ण होणार आहे संगणक क्षेत्रातील तीन वर्षाच्या पदवीनंतर स्टेटस भारतामध्ये व्यवसाय करण्याची त्याची इच्छा आहे त्यातून त्याच्यासारख्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल.

दिगंबर गाजरे यांना दोन मुले ही दोन्ही मुले जन्मताच पूर्णतः अंधत्व होती. दिगंबर गाजरे यांनी मोलमजुरी करून दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च बारावीपर्यंत कसाबसा भागवला, दोन्ही मुलांमधील राहुल हा लहानपणापासूनच हुशार व त्याच्या संशोधन पद्धतीमुळे चांगले गुण संपादन केले, मात्र बारावीनंतर राहुल  युके ससेक्स विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देऊन  चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. मात्र आता परदेशी शिक्षणासाठी लागणारा खर्च  प्रचंड प्रमाणात असल्यामुळे दानशूर संघटनांकडून मदत करावी. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आव्हान त्यांच्या वडिलांकडून करण्यात येत आहे.  राहुल या संशोधन वृत्तीला आर्थिक प्रकाशाची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments