मंगळवेढा/प्रतिनिधी :
१४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या ४० वीर जवानांना हुलजंती येथील सन फाउंडेशनच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी हुलजंती ग्रामपंचायत नूतन सरपंच मिनाक्षी कुरमुत्ते, उपसररपंच बाळासाहेब माळी व सर्व नूतन ग्रामपंचयत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत वीरपत्नी कविता नागप्पा म्हत्रे यांचा सन्मान करून विर जवानांना पुष्पहार व मेणबत्ती प्रज्वलित करून मांवनदना देण्यात आली. तर दिलीप भोरकडे यांनी देखील रांगोळीच्या माध्यमातून वीर जवानांना मानवंदना दिली.
यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अमीर आतार, ग्राहक मंच जिल्हा अध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार) नूतन ग्रा. पं सदस्य शिलवंती येड्डे, अनिता भोरकडे, मंदाकिनी माळी, सविता शिंदे, महादेव पेटर्गे, शांतीलाल भोरकडे, आदर्श शिक्षक पुरस्कर्ते शिवानंद कोळी, माजी सरपंच गोविंद भोरकडे, माजी उपसरपंच पैगंबर मणेरी, शिक्षक आप्पाराया न्यामगोंडे, रेवाप्पा माळी, म्हाळाप्पा माळी, पत्रकार म्हाळाप्पा शिंदे, रोहिदास भोरकडे, महेश पडवळे,रमेश पुजारी, बापूसाहेब कुंभारी, मारुती पेटर्गे, तानाजी सोनवले, दादा सोनवले, महेश भोरकडे, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष जामदार यांनी मानले.
0 Comments