कोरोनामुळे बंद असलेली महाविद्यालये आता १५फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.
राज्यात ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आल्यानंतर, परीक्षांच्या बाबतीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काल ते पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी उपस्थितीबाबत वक्तव्य केले होते.
"राज्यातील महाविद्यालये कोरोना चे नियम पाळण्यासाठी आत्ता तरी सिद्ध नाहीत आणि त्यासाठी लागणारी जागा देखील उपलब्ध नाही. म्हणून काही केसेस मध्ये ५०% आणि काही केसेस मध्ये २५% उपस्थिती मध्ये महाविद्यालय सुरू होऊ शकतात", असे ते बोलले होते.
५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आता ही महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत असेही त्यांनी आज पुन्हा सांगितले. ७५% सक्तीच्या उपस्थितीची अट आता कोरोनामुळे लागू होणार नसल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली!
0 Comments