माझ्यासारखा परफॉर्मन्स पृथ्वीतलावर कोणी करू शकत नाही - कंगना राणावत


कंगना रनौत आणि वाद हे समीकरण जणू ठरलेलं आहे. कंगना नेहमीच तिच्या ट्वीटमुळे चर्चेत असते. सध्याही तिने सोशल मीडियावर स्वतःची तुलना तीन वेळा ऑस्कर विजेती अभिनेत्री मेरिल स्ट्रीपशी आणि गल गॅडोटशी केली आहे आणि आपण या पृथ्वीतलावरची सर्वात चांगली अभिनेत्री आहोत असाही तिने दावा केला आहे.

कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये लिहलंय की, "मी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करतेय त्या प्रकारचा परफॉर्मन्स या पृथ्वीतलावर कोणीही करु शकत नाही. मेरिल स्ट्रीप ज्या पद्धतीने अभिनय करते त्याच प्रकारचे कौशल्य माझ्याकडे आहे आणि गल गॅडोटप्रमाणे ग्लॅमर आणि अॅक्शन माझ्यात आहे. थलायवी आणि धाकड."

(Advertise)

या ट्विटनंतर काही चाहते नाराज झाले आणि कानग्नावरती टीका करू लागले तेव्हा कंगणाने पुन्हा ट्विट करत टिका करणाऱ्यांना प्रतिउत्तर केलं आहे. कंगना म्हणते की, "काही मला विचारतात की मला किती ऑस्कर मिळाले, त्यांनी मेरिल स्ट्रीपलाही विचारलं पाहिजे की तिला किती पद्म पुरस्कार मिळाले. याचं उत्तर नकारार्थी असेल. तुमच्या गुलामी मानसिकतेतून बाहेर या आणि स्वत: बद्दल काही आदर कमवा."


Post a Comment

0 Comments