पंढरपूर येथे फुटबॉल स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर येथे प्रथमच डीव्हीपी चषक फुटबॉल स्पर्धेचे राज्यस्तरीयवर आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ग्राउंड येथील फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील पोलिस निरीक्षक अरुण पवार तहसीलदार विवेक साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले यास फुटबॉल स्पर्धेत राज्यातून २४ फुटबॉल संघानी सहभाग नोंदवला आहे ही स्पर्धा पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

(Advertise)

उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील बोलताना म्हणाले पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात युवकांना संधी मिळावी म्हणून असा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच भारतात प्रसिद्ध असणाऱ्या क्रिकेट खेळा व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतून कोरोना महामारी नंतर खेळाडूंना एक व्यासपीठ मिळणार आहे यातूनच पंढरपूरला एक नवीन ओळख निर्माण होण्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महादेव धोत्रे, संजयबाबा ननवरे, विशाल मर्दा शेठजी, पांडुरंग बोडके, भालचंद्र देवधर सर, डॉ.आरिफ बोहरी, विक्रमसिंग भोसले, अर्जुन पवार, फुटबॉल प्रशिक्षक किरण जाधव, युवराज मुचलंबे, ओंकार जोशी, ओंकार वाळूजकर, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य संजय अभ्यंकर, विठाई फुटबॉल क्लबचे सर्व सदस्य, मान्यवर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments