‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’



 केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाला राज्यातून पाठींबा देण्यात येत असून शिवसेनेने देखील वेळोवेळी शिवसेनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आहे.

(Advertise)

शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून गाझीपूर बॉर्डर येथे त्यांनी शेतकरी नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी नेत्यांसोबत गळाभेट घेतलेले फोटो चांगलेच व्हायलर झाले आहेत. तर, संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी उचललेल्या पावलाचा निषेध देखील केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या दौऱ्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत जळजळीत टीका केली आहे. ‘संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments