सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण


 शनिवारी पुन्हा सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे. दरम्यान लग्न सराईचा काळ असल्यामुळे सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीचे दर मात्र वधारले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत चांदीच्या दरात ५०० रूपयांनी वाढली आहे. तर दुसरीकडे सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. 

आज सोन्याचे भाव फक्त दहा रूपयांनी घसरले आहेत. याआधी सोन्याचे दर ३०० रूपयांपासून ३४० रूपयांवर आले होते. सोन्याच्या दरात सतत होत असलेल्या घसरणी मुळे  सोने खरेदीसाठी  मागणी वाढली आहे. कोरोना काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर सोन्याचे दर घसरत आहेत. आज राजधानी दिल्लीत १० ग्राम २२ कॅरेट सोन्यासाठी ४६ हजार ३९० रूपये मोजावे लागत आहेत. तर १० ग्राम २४ कॅरेट सोन्यासाठी ५० हजार ६१० रूपये मोजावे लागत आहेत. तर येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


Post a Comment

0 Comments