एका पॉपस्टारच्या ट्विटला कंगना उत्तर देताना म्हणते, ते शेतकरी नाहीत दहशतवादी आहेत



मुंबई : कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता तिच्या टिकेची लक्ष झाली आहे पोपस्टार रिहाना.केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेली दोन महिने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनावरून जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने एक ट्विट केलं आहे. 

या ट्विट मध्ये सीएनएन च्या शेतकरी आंदोलनाच्या बातमीचा संदर्भ देत ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. पण रिहानाच्या या ट्वीटवर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने टीका केली आहे.

रिहानाच्या ट्विटवर प्रत्युत्तर देताना कंगनाने लिहलं की, ‘कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरुन चीनसारखे देश आपल्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू’

Post a Comment

0 Comments