प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:
ठाणे येथे दिव्यांग बंधू-भगिनीसाठी राज्यस्तरीय हस्तकला स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या कलागुणांसाठी या स्पर्धेचं आयोजन आले होते.या स्पर्धेत जयसिंगपूरची कु.शितल कोरवी हिने ठाण्याचा दिव्य अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून जयसिंगपूर शहरवासीयांच्या अभिमान द्विगुणित केला.
ठाण्याच्या A.V. या संस्थेने संपूर्ण राज्यातील दिव्यांग बंधू-भगिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हस्तकला स्पर्धेचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. यासाठी संबंधित स्पर्धकाची हस्तकला व या हस्तकलेला जेवढ्या लाईक्स मिळतील या आधारावर हस्त कलाकार स्पर्धक या स्पर्धेच्या पुरस्काराची मानकरी ठरणार होती. या स्पर्धेत जयसिंगपूरची हस्तकलाकार स्पर्धेक व दिव्यांग भगिनी कु.शितल कोरवी हिने या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कलाकुसरीच्या माध्यमातून उत्तम पद्धतीच्या हस्तकला वस्तू बनवून या स्पर्धेस त्याचा व्हिडिओ पाठविला होता. या स्पर्धेच्या नियमांना अधिन राहून या भगिनीने ऑनलाइन पद्धतीने आपण केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंच्या व्हिडिओची लिंक सर्वत्र पाठवून लाईक्स व कमेंट्स मिळवायच्या होत्या. त्याच वेळी जयसिंगपूरातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन तिला जास्तीत जास्त लाइक कसे मिळतील यासाठी प्रयत्न केला त्याचा परिणाम म्हणून जयसिंगपूर वासिया बरोबर महाराष्ट्रातील तमाम कलाकार व हस्तकलेचे भोक्ते यांनी तिने केलेल्या उत्तम हस्तकला वस्तूंना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यामुळे उत्कृष्ट हस्त कलाकारी, लाईकच्या व लोकांचे प्रेम यामुळे ही स्पर्धा प्रथम क्रमांकाने यशस्वी पूर्ण करू शकली. तिच्या या कलाविष्काराचे मनापासून अभिनंदन सर्वत्र होत आहे. कु.शितल कोरवी हिने देखील प्रथमतः जयसिंगपूर वासियांचे व महाराष्ट्रातील जनतेचे तिने मनस्वी आभार मानले आहे.
कु.शितल विश्वनाथ कोरवी ही मूळची जयसिंगपूर शहरातील संभाजीनगर झोपडपट्टीतील असून अत्यंत गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. परंतु पालकांनी दिलेली साथ यामुळे तिने शिक्षण पूर्ण केले. जन्मताच अपंगत्व आल्यामुळे व घरची गरिबी यामुळे ती कष्टप्रद जीवन जगत होती. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती व जीवन जगण्याची तळमळ तसेच आईवडिलांची साथ, प्रेम व भावंडांनी दिलेला मदतीचा हात यामुळे ती सातत्याने आपले शिक्षण व हस्तकला जोपासण्याचे काम श्रद्धेने केले. त्यामुळे अल्पावधीतच तिच्या हस्त कलांकारीचे कौतुक होऊन मोठी मागणी येत गेली. कु. शितल कोरवी हिने हस्तकला बनवण्याची उत्तम हातोटी प्राप्त केली असून वेगवेगळ्या स्वरूपातील हस्तकला प्रसिद्ध आहेत. या अगोदरही राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून जयसिंगपूर वासियांना ही तिचा सार्थ अभिमान वाटत आहे.
तिच्या या यशाला साथ देण्यासाठी 'विकलांग सेवाभावी संस्था नांदणी, ता. शिरोळ जि. कोल्हापूर' व 'नामदार यड्रावकर फाऊंडेशन शिरोळ तालुका' यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तिने यांचेही मनस्वी आभार मानले आहे.
1 Comments
Good and very innovative
ReplyDelete