भारतीय संघाचे पहिल्याच डावात पानीपत, फॉलोऑनचे संकट कायम...


 इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातच भारतीय संघाचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण इंग्लंडच्या ५७८ धावांचा पाठलाग करताना भारताची ६ बाद २५७ अशी अवस्था आहे. त्यामुळे भारतीय संघावर फॉलोऑनचे संकट येऊ शकते, असे म्हटले जात आहे. भारताला जर फॉलोऑनचे संकट दूर सारायचे असेल तर त्यांना ३७८ धावा कराव्या लागतील. 

 पण भारताचे हे तळाचे फलंदाज हे आव्हान पेलणार का, याची उत्सुकता चाहत्यांना चौथ्या दिवशी असेल. फॉलोऑन टाळण्यासाठी भारतीय संघाला १२१ धावांची गरज आहे.

(Advertise)

इंग्लडने कालच्या ५५५ धावांवरुन आज खेळायला सुरुवात केली. इंग्लंडने त्यानंतर २३ धावांची भर घातली आणि त्यांनी पहिल्या डावात ५७८ अशी विशाल धावसंख्या उभारली. भारताकडून यावेळी आर. अश्विन आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या.

Post a Comment

0 Comments