महाविकासआघाडी सरकारमधील कॅबिनेटमंत्री यांच्या समोर अडचणी काही संपताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच गाजलेले बलात्काराच्या आरोपांचे प्रकरण शमते ना शमते तोच आता त्यांच्या समोर आणखी एक नवीन संकट उभा ठाकल्याचं दिसत आहे. कारण, त्यांची दुसरी पत्नी करूणा यांनी त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात मागील तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे, असा आरोप करूणा यांनी केला आहे. तर, दोन मुलांपैकी एक १४ वर्षांची मुलगी असून ती सुरक्षित नाही, असं देखील करूणा यांचं म्हणणं आहे. एवढच नाही तर पोलिसांनी या प्रकरणी सहकार्य न केल्यास २० फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे
0 Comments