“मुलांना थंड हवेच्या ठिकाणी जरूर न्या, पण…”, प्रवीण तरडेंचा पालकांना सल्ला.....


मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियाद्वारे अनेकदा त्यांचे मत मांडताना दिसतात.  नुकताच प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पालकांना सल्ला दिला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.
 
फेसबुकवर प्रवीण तरडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.

(Advertise)

या फोटोमध्ये ते मुलासोबत सिंहगड किल्ल्यावर बसले असल्याचे दिसत आहे.  दरम्यान त्यांच्या हातात ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी असल्याचे दिसत आहे.  ‘मुलांना ट्रिपला “थंड हवेच्या“ ठिकाणी जरूर न्या.. 
पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा’ असे म्हणत त्यांना पालकांना सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियावर प्रवीण तरडेंची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

0 Comments