भाजपला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलिस, मुख्यमंत्र्यांची बदनामी ; सचिन सावंतांची कंगना रानावत आणि भाजपवर जोरदार टीका


नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रानौत यांच्यात नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच वाद पेटला. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ऑफिससाठी नवी जागा विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. कंगनाने त्याच मुद्द्यावर उर्मिलावर निशाणा साधला होता. कंगनाच्या याच टि्वटवरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधलाय.

'भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही. परंतु उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे,' असे टि्वट कंगनाने केले होते. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाला जोरदार टोला लगावला आहे. सावंत टि्वट करून म्हटले, 'खरंच, भाजपला खूश करून… भाजपला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजप आणि भाजपचे हे मोठे षडयंत्र होते, याचा हा कबूलीजबाब आहे. भाजपाने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून त्यांना मुक्ती मिळणार नाही,' अशी टीका केली आहे.

(Advertise)

कंगनाने उर्मिला यांच्यावर टीका करत टि्वट केले होते की, 'भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही. परंतु उर्मिला यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झालाय. उर्मिलाजी, मी स्वत:च्या मेहनतीने घर विकत घेतले होते. परंतु काँग्रेस ते तोडत आहे. भाजपला खूश करुन माझ्या हातात फक्त २५-३० कोर्ट केस आल्यात. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते, तर काँग्रेसला खूश केले असते. किती मुर्ख आहे ना मी?' 

Post a Comment

0 Comments