"शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही"



बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम शरद पवार यांनी केलं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी सांगितलं. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय बैठकीत बोलत होते.

शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही. पवार इज पॉवर. पवारांनी मुख्यमंत्री असताना मैलाचे दगड व्हावे, असे निर्णय घेतले, असं खडसेंनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकार आणण्याचे काम शरद पवारांनी केले. हे कधीही न होण्यासारखे काम होते. ते पवारांनी शक्य केलं. भाजपला बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतला, असं एकनाथ खडसेंनी सांगितलंय.

काँग्रेस उभ्या हयातीत भाजपसोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा विषयच नाही. एकदा भाजपने प्रयत्न केला. पण काय झालं? याचा त्यांना चांगला अनुभव असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी भाजपला लगावला.

Post a Comment

0 Comments