बार्शी/प्रतिनिधी:
सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रभाव पाहता सोलापूर जिल्ह्यात देखील सर्वाधिक रुग्णांची भर वाढत आहे.त्यातच बार्शी तालुका हा सर्वत्र मोठा तालुका आणि मोठी बाजारपेठ आणि मोठ्या उत्पन्नाचा तालुका म्हणून ओळखला जातो .
(Advertise)
बार्शी नगरपालिका देखील स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे. एकीकडे नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत चांगले काम करत असताना, दुसरीकडे नगरपालिकेचे कर्मचारी आणि कामासाठी आलेले सर्वसामान्य नागरिक यांच्या गाड्या नगरपालिकेच्या गेट समोर उभ्या असतात .
सध्या बार्शी शहरांमध्ये वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बार्शी नगरपालिका हे मध्यवर्ती भागात असल्याने तेथे रहदारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे . नगरपालिकेची स्वतंत्र हक्काची पार्किंग नसल्याकारणाने गाड्या रोडवरती उभ्या असतात.
याकडे कोणत्याच प्रशासनाचे लक्ष नाही का? ट्रॅफिक पोलीस कर्मचार्यांचे देखील लक्ष नाही, का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचा मनात उपस्थित होत आहे. वाहतुकीबद्दल ट्रॅफिकचे प्रमाण वाढून देखील तेथे वाद-विवाद सतत मोठ्या प्रमाणात चालू असतात. तरी नगरपालिकेने स्वतंत्र पार्किंग ची सोय करावी असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या मनातुन पार्किंग विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
0 Comments