उद्या आमदार भारत भालके यांना वाहण्यात येणार सर्वपक्षीय श्रद्धांजली



मंगळवेढा/प्रतिनिधी :


दिवगंत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूने गोरगरीबाचा आधारवड हरपला आहे. शुक्रवार दि. ४ रोजी त्यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काॅ.शहराध्यक्ष मुझ्झमील काझी यांनी दिली आहे.
(Advertise)

दि.२७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील रूबी रूग्णालयात उपचारा दरम्यान आ.भारत भालके यांचा मृत्यू झाला.
मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील मागील ११ वर्षात आमदार म्हणून सर्व जाती धर्माचे लोकांच्या सुखदुखात थेट सहभागी होत उपस्थिती लावल्यामुळे जनतेचे मनावर एक वेगळी छाप पाडून आ.भालके हे जनतेचे सलग तीन वेळा आमदार ठरले.
(Advertise)

त्यांनी २००९ पासून प्रत्येक वेळी वेगवेगळे चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवून बलाढ्य आशा उमेदवारांना चितपट केले. यावरून मंगळवेढा व पंढरपूर मतदार संघात त्याची लोकप्रियता दिसून येते. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला.

त्याचे आत्मेस शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करण्याच्या उद्देशाने  मंगळवेढा तालुक्यातील सर्व पक्षीय श्रद्धांजली वहानेसाठी मारूती पटांगण मंगळवेढा येथे साय ०६ वाजता  सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत मास्कचा वापर करून हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments