लॉकडाऊनच्या अफवेने शेतकऱ्यांच्या कापूस बाजारात कवडीमोल भाव ; व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट



कोरोनाची प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे शेतक लॉक डाऊन लागण्याच्या दृष्टीने आपल्या शेतीतील कापूस, सोयाबीन, मका बाजारात मिळेल, त्या बाजार भावात विकून मोकळा होत आहे.

 त्यामुळे व्यापारी देखील शेतकऱ्याची शेतीमाल कवडीमोल भावात विकत घेत आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात मोठा भर पडली असून भविष्यात कसे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पार्श्वभूमीवर देशात २२ मार्च पासून अचानक लोकडॉन सुरू करण्यात आला, दरम्यान काळात शेतकऱ्याच्या घरात पडलेली पडलेला माल भाजी पाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती.

 उधारी उसनवारी वर कर्ज काढून पिकवलेल्या शेतीमालाच्या शेतकऱ्याला एक रुपये पदरी पडला नव्हता त्यामुळे काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालाला रस्त्यावर  थेट फेकून देण्याची वेळ शेतकरी राहिली होती, आता तीच वेळ पुन्हा येईल या भीतीपोटी शेतकरी आपल्याकडे असलेला मका कापूस तूर बाजारा मध्ये मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्याला विकून मोकळे होताना दिसत आहे.

त्यामुळे व्यापारीही शेतकऱ्याच्या शेती मला आठवण च्या भावात खरेदी करून सरळ सरळ शेतकऱ्याचे आर्थिक लूट करत आहे. कोरोनाची प्रार्दुभावाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येणाऱ्या बातम्या सर्वत्र प्रसारित होत आहे या अफवांमुळे शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. आपला शेतीमाल सध्या मिळेल त्या कवडीमोल भावात विकत आहे तर दुसरीकडे व्यापारी देखील शेतकऱ्यांना लॉकडाऊन लागेल सर्व बंद होईल असे म्हणत शेतकऱ्यांकडून कमी दरामध्ये खरेदी करत आहे.

 उत्पन्न लॉकडाऊन लागेल या आफवेने शेतीमालाला भाव भेटणार नाही. आपला माल व्यापाऱ्याला कवडीमोल दरामध्ये विकताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments