खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल



पंढरपूर/प्रतिनिधी:

पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या  सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची असल्याची माहिती पंढरपूर विभागीय पोलिस अधिकारी विक्रम चव्हाण यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भात खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करून पदावरून निलंबित  करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती. 

 सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी एक डिसेंबर रोजी पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी हे पंढरपूर शहरातील द.ह. कवठेकर प्रशाळेत १९० क्रमांकाच्या मतदान केंद्रात थेट प्रवेश केला होता.  केंद्रावर जाऊन प्रत्यक्षरीत्या तेथे मतदान करणाऱ्या मतदान मतदारांवर प्रभाव पडण्याच्या हेतूने केंद्रात प्रवेश केल्याचा ठपका ठेवत, डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याात आला.



काय आहे हे प्रकरण

येथील द. ह. कवठेकर प्रशालेत पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र होते. १ डिसबेर दुपारी मतदान प्रक्रिया सुरू असताना दुपारी तीन वाजून २० मिनिटाच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी या मतदान केंद्राच्या आवारात पाहणीसाठी आले. मतदान प्रक्रिया सुरू होती, त्या वर्गात प्रवेश करून पाहणी केली. हा प्रकार पाहून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्यासाठी आवश्‍यक परवानगी आहे का, अशी विचारणा खासदारांकडे केली. परंतु खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून समाधानकारक उत्तम मिळाले नाही. निवडणूक कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशिवाय परवानगी खेरीज कोणालाही मतदान केंद्रात प्रवेश करता येत नाही. असे असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी थेट मतदान केंद्रात कसा प्रवेश केला, याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments