राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरु झाली आहे. याचा पहिला निकाल हाती आला असून धुळे - नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपाने धुव्वा उडविला आहे. भाजपचे अमरीश भाई पटेल हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
भाजपचे अमरीश भाई पटेल यांना ३३२ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली. तर ४ मते बाद झाली आहेत.
दरम्यान राज्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली असून सोलापूरमध्ये मतमोजणीसाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
0 Comments