देशातील वाढत्या महागाईमुळे सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे.
कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या
डिसेंबर महिन्यात १९ किलोग्रॅम कमर्शिअर गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये सर्वाधिक ५६ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये ५५ रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये देखील ५५ रुपयांची वाढ झाली आहे.
कसे तपासाल LPG गॅस सिलेंडरचे नवे दर
iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या शहरातील दर तपासू शकता.
कसे निश्चित होतात घरगुती गॅस सिलेंडरचे दर
एलपीजी सिलेंडरच्या किंमती सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क दर आणि परकीय चलन विनिमय दरानुसार निश्चित केल्या जातात. यामुळे, दरमहा एलपीजी सिलेंडरच्या सबसिडीची रक्कमही बदलते. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढतात तेव्हा सरकार अधिक अनुदान देते आणि दर खाली आल्यावर अनुदान कमी केले जाते. कराच्या नियमांनुसार, एलपीजीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) इंधनाच्या बाजारभावानुसार मोजला जातो.
0 Comments